असा आहे ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ सिनेमाचा उत्तरार्ध!
महा एमटीबी   16-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके लेखक व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाचा उत्तरार्ध लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वर्षाच्या सुरुवातीला या सिनेमाचा पूर्वार्ध प्रदर्शित झाला होता. ८ फेब्रुवारी रोजी या सिनेमाचा उत्तरार्ध प्रदर्शित होत आहे. ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाच्या उत्तरार्धाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
 
 
 
 

बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, जवाहरलाल नेहरु, बाबा आमटे, सुनीताबाई देशपांडे यांसारख्या दिग्गजांची पु.ल देशपांडे यांच्याशी झालेली भेट या सिनेमाच्या उत्तरार्धामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पु.ल. देशपांडे यांचे उतारवयही या उत्तरार्धात दिसणार आहे. अभिनेता विजय केंकरे यांनी उतारवयातील पु.ल देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारली आहे. पु.ल देशपांडे यांचा रंगभूमीवरील प्रवेश, बाबा आमटे यांच्या आनंदवनसाठी पु.ल देशपांडे यांनी केलेली मदत, देशातील आणाबाणीच्या काळात पु.ल देशपांडेंनी घेतलेली भूमिका अशा अनेक घटना या सिनेमाच्या उत्तरार्धामध्ये दाखविण्यात आल्या आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/