'छत्रपती शिवाजी' सिनेमातील रितेशचा लूक पाहिलात का?
महा एमटीबी   15-Jan-2019


 
 
 
 
 
 
मुंबई : रवी जाधव यांचा ‘छत्रपती शिवाजी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता रितेश देशमुख या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील रितेश देशमुखचा लूक नुकताच समोर आला. रितेश देशमुखने या सिनेमाबाबत याआधी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले होते.
 
 

 
 

अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असल्याने त्याच्या चाहत्यांच्या मनात छत्रपती शिवाजीया सिनेमाविषयी उत्सुकता शिघेला पोहोचली होती. दाढी, शिवरायांप्रमाणेच वेशभूषा, आणि कपाळावर चंद्रकोर असा रितेशचा लूक आहे. अभिनेता रितेश देशमुख या लूक मध्ये शोभून दिसत असून सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/