जलगांव 'व्यावसायिक क्रिकेट लीग' शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |

सागर पार्क क्रिकेट क्लबचा उपक्रम, आठ संघांचा समावेश

 
 
जळगाव, 15 जानेवारी
सागर पार्कवर दररोज मैदानात खेळायच्या निमित्ताने जमणार्‍या उच्चशिक्षित विविध व्यावसायिक व समविचारी मित्रांनी ‘चला खेळूया स्वास्थ्यासाठी’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापन केलेल्या ‘सागर पार्क क्रिकेट क्लब’ तर्फे प्रोफेशनल क्रिकेट लीगचा शुभारंभ मंगळवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर करण्यात आला. यानिमित्ताने दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यापैकी काही सामने झाले.
 
 
डॉक्टर्स, सिव्हिल इंजिनिअर्स, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, इंटेरिअर्स, वकील (2 संघ), एमबीए, सा.बां. विभाग इंजिनिअर्स, आयएमए अशा एकूण 8 संघानी या स्पर्धेत सहभाग घेेतला आहे. 15, 16 जानेवारी रेाजी या दोनदिवसीय स्पर्धा रंगत आहेत. सकाळी 7.30 वाजता स्पर्धेचे उद्घाटन क्लबचे ज्येष्ठ सदस्य संजय भावसार, तुषार तोतला यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
आज झालेले साखळी सामने व निकाल -
1) आर्किटेक्ट विरुद्ध चार्टर्ड अकाउंटंट (चार्टर्ड अकाउंटंट विजयी)
2) सा.बां.विभाग इंजिनिअर्स विरुद्ध जळगाव डिस्ट्रिक्ट वकील संघ (जळगाव डिस्ट्रिक्ट वकील संघ विजयी)
3) आयएमए डॉक्टर्स विरुद्ध एमबीए सुपरस्टार्स (आयएमए डॉक्टर्स विजयी)
4) सिव्हिल इंजिनिअर्स युनायटेड विरुद्ध स्पार्टन्स अ‍ॅडव्होकेट्स ( सिव्हिल इंजिनिअर्स युनायटेड विजयी)
 
परस्परांतील संबंध अधिक दृढ होऊन शहराकरिता सकारात्मक कार्य करावे, यासाठी या क्लबचे सदस्य प्रयत्नशील असतात. सागर पार्क हे एकमेव मैदान सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असून ते सामाजिक आणि राजकीय उपक्रमाकरिता महापालिकेतर्फे नाममात्र दराने देण्यात येते. बर्‍याच संस्था ग्राऊंडवर कार्यक्रमानंतर झालेली घाण तशीख पडू देतात. ही सर्व घाण सागर क्रिकेट क्लबच्या मित्र मंडळाचे सहकारी नित्यनियमाने साफ करतात. याशिवाय त्यांनी सागर पार्कवर तब्बल 50 झाडे लावून पर्यावरण जतनाचा संदेश दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@