भुसावळ शहराची विकासाकडे वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |
भुसावळ,
भुसावळ शहराची विकासाकडे वाटचाल होत असून १७ जानेवारी पासून शहरात होणार्‍या सर्व्हेक्षणानंतर नवीन विकास आराखडा समोर येणार आहे. राज्यात कदाचित भुसावळ हे पहिलेच शहर असू शकेल ज्याचा विकास आराखडा मास्टर प्लान होत आहे.
 
 
भुसावळ शहराची ओळख ही रेल्वेचे जंक्शन स्थानक , आशिया खंडातील मोठे यार्ड, दीपनगर येथील औष्णिक विज निर्मिती केंद्र, एकाच तालुक्यात असलेल्या दोन आयुध निर्माणी, झेडटीसी व आर्मी कॅम्प यासोबत वेल्हाळे येथील मकरध्वज मंदिर, वरणगाव येथील १३ वे ज्यार्तीलिंग , कंडारी येथील कपिलेश्‍वर मंदिर अशी ओळख आहे.
 
 
शहराचा वाढता विस्तार आणि भौगोलिक दृष्ट्या वाढत असलेले महत्त्व पाहता भुसावळ जिल्हा व्हावा अशी मागणी अनेक दशकांपासून होत आहे. तसचे नाशिक विभागात भुसावळ नगर परिषद ही एकमेव अ दर्जा असलेली नगर परिषद आहे. या नगर परिषदेचे रुपांतर महानगर पालिकेत व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती त्या अनुषंगाने सकारात्मक वाटचाल होत आहे.
 
 
भुसावळसाठीच विकास आराखडा का ?
भुसावळ शहरात सरकारी नोकरांची संख्या अधिक आहे. शहारात रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे तसेच राष्ट्ीय महामार्ग क्र. ६ हा सुध्दा जातो. शहराशी दीपनगर, वरणगाव, बोदवड हे गावे जोडलेलीच आहेत. दळणवळणाची व्यवस्था पुरेशी आहे. हतनूर धरण आहे, शहराला लागुन तापी नदी वाहते. भोगौलिक दृष्ट्या शहराचे महत्त्व वाढलेले असल्याने येथे एम.आय.डी.सी.सुरू झाली आहे. शहरात नागरिवस्त्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे आसपासच्या खेड्यांपर्यंत शहराचा विस्तार झाला आहे. शहराच्या गरजा बघता पहिल्या डीपीकडून आजपर्यंत वापरल्या जाणार्‍या जमिनीच्या वापरात अनेक ठिकाणी बदल झाले आहेत.
शहराची लोकसंख्या वाढली परंतु त्यास्वरुपात विकास झालेला नाही. काही दशकांपुर्वी केलेले नियोजन कोलमडत आहे. अगामी ५० वर्षांचा विचार करुन शहराचा आराखडा तयार करणे काळाची गरज झाली आहे. म्हणून पुणे येथील अभिायांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून भविष्यातील नियोजनासाठी शहराचे सर्व्हेक्षण केले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@