इथे घडविले जातात भावी संशोधक ‘संडे सायन्स स्कूल’
महा एमटीबी   15-Jan-2019


विद्यार्थीदशेत जे शिक्षण घेतले जाते तेच शिक्षण आयुष्यभराच्या पुंजीसाठी पूरक असते. मात्र, या पुंजीसाठी शिक्षणपद्धतीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. उत्तम शिक्षणपद्धतीतच उद्याचे भविष्य घडते. याचा उत्तम प्रत्यय म्हणजे संडे सायन्स स्कूल!

 

विज्ञानाची भीती जेवढी विद्यार्थ्यांना असते तितकेच त्याचे कुतूहलही त्यांना असते. मात्र ही भीती त्यांच्या मनातून काढत त्यांची उत्सुकता वाढविण्याचे काम संडे सायन्स स्कूल या संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे केले जात आहे. या संस्थेचे मुख्य केंद्र पुण्यात आहे. २०११ साली या संस्थेची उभारणी तीन डॉक्टरांनी केली. सुयश डाके, दिनेश निसंग, सुजाता विर्धे यांनी. पाश्चात्त्य देशात मुलांना प्रयोग प्रत्यक्ष करायला देऊन त्यांचे ज्ञानवर्धन केले जाते. भारतात मात्र सैद्धांतिक ज्ञान जास्त दिले जाते. पण जर प्रयोग त्यांनी स्वतः केले तर त्यांची जिज्ञासू वृती प्रेरित होईल आणि उद्याचे संशोधक तयार होतील, या भावनेने या संस्थेचे काम चालते. आज या संस्थेची ९ राज्यांत ७० हून अधिक केंद्रे असून ३५ हजारहून अधिक विद्यार्थी स्वानुभव घेऊन बाहेर पडले आहेत. २००८ मध्ये, एसएसएसएस प्रोग्राम अहमदनगर, महाराष्ट्र येथे सुरू करण्यात आला. ३ वर्षांच्या यशस्वी समाप्तीनंतर, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआरमधील ७५ हून अधिक ठिकाणी या प्रोग्रामची पुनरावृत्ती झाली. विज्ञान कार्यकलापांच्या समृद्ध अनुभवावर आधारित आणि २० वर्षांहून अधिक काळ विज्ञान किटचे उत्पादन व डिझायनिंग यावर आधारित काम केले जाते. ३ री ते ५ वी व ६ वी ते ९ वी व पुढील इयत्तांसाठी त्यांची प्रयोगशाळा आहे. कल्याण-डोंबिवलीत या संस्थेचे काम स्मिता कोल्हे या पाहतात.

 

या संस्थेचे निर्माते सुयश ढाके यांनी थर्ड वेव्ह सायंटिफिक प्रोडक्ट प्रा.लि. आणि कुतूहलची स्थापना केली. १९९४ साली त्यांनी आपली पहिली कंपनी नोंदणी केली तेव्हा, त्यांनी मुलांसाठी DIY विज्ञान प्रयोग किट तयार केले. सी-डॅकमधील शास्त्रज्ञ म्हणून नोकरी सोडल्यानंतर सुयश यांनी ‘सायन्स एज्युकेशन इन इंडिया’ मध्ये बदल घडवून आणण्यासाठी करियर समर्पित केले आहे. त्यांनी सायन्स किटवर शेकडो हात विकसित केले आहेत. ते एक समर्पित विज्ञान संवाददाता आणि खूप आशावादी आहे. संस्थेने रविवारीय विज्ञान शाळेच्या कार्यक्रमाची एक अद्वितीय आणि ऑफ-बिट थीम तयार केली आहे. हे विद्यार्थ्यांसाठी एक चौकशी आधारित अनुभवी विज्ञान शिक्षण आहे. नियोजित सत्रांमध्ये मुलांना विविध क्रियाकलाप आणि प्रकल्प दिले जातात. त्यांना सहायकांच्या मदतीने अंतर्भूत वैज्ञानिक संकल्पना समजतात. विद्यार्थ्यांनी केलेले सर्व प्रयोग आणि प्रकल्प अतुलनीय संकल्पना समजून घेण्यासाठी त्यांना दिले जातात. रविवारीय विज्ञान विद्यालय एक अनुभवी शिक्षण आहे, ज्यात विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात. विज्ञानशाळेने शालेय मुलांवरील आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. योग्य वयात तयार झाल्यास, मुले आपल्या देशासाठी एक मनुष्यबळ संपत्ती बनतील. अनुभवात्मक शिक्षणावर या संस्थेने जोर दिला आहे. विज्ञान-कृतींमुळे मुलांना त्यांच्या स्वत:च्या वेगाने विज्ञान शोधण्यात मदत करतात. ते प्रयोग आणि त्यांच्या परिणामांद्वारे काही परिकल्पना सिद्ध करतात. हे मुलांमध्ये, जसे जिज्ञासा, अवलोकन कौशल्य, विश्लेषणात्मक दृष्टिकोन, समस्या सोडविण्याचे तंत्र, वैज्ञानिक स्वभाव, सृजनशीलता, धैर्य यांमधील बरेच गुण विकसित करते. स्मिता कोल्हे यांनी संडे स्कूलचे पुण्यातील काम पाहिले व त्यापासून प्रेरित होऊन हे काम कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरात व्हावे असा उद्देश मनात बाळगून या कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात २५ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले हे काम दिवसागणिक वाढत आहे. आजच्या घडीला सुमारे ७० विद्यार्थी या स्वानुभव विज्ञानशाळेचा अनुभव घेत आहेत. रविवारी फक्त २ तास मुलांनी हातांनी प्रयोग करायचे व घरी घेऊन जायचे. या संस्थेचे सुयश ढाके यांनी बनवलेले कीट मुलांना प्रयोगासाठी दिले जाते.

 

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून संडे सायन्स स्कूलची सुरुवात होते व पुढे २२ रविवार चालते व २८ फेब्रुवारीला विज्ञानदिनी त्याचे समापन होते. साधारणतः मुलांना पुस्तकात जे प्रयोग आहेत, जे पुस्तकात ‘घरी करून बघा’ या कॉलमला दिलेले असतात पण आपल्याकडे साहित्य नसल्याकारणाने ते आपण घरी करून बघू शकत नाही, असे सगळे प्रयोग केले जातात. तिसरी ते ५ वी (जुनियर लेव्हल) या वयोगटातील मुलांना सायन्स विषय अजून अभ्यासक्रमात आलेला नाही पण पर्यावरणशास्त्र हा विषय असतो. अवतीभवती घडणार्‍या गोष्टींमागील सायन्सही मुलांना समजावले जाते. या संस्थेच्या वतीने एअर साऊंड (Air Sound) संतुलन (Balancing) सरफेस टेनसन (Surface Tenson) सेनटरीफुगल फोर्स, सिड जर्मीनेशन (Seed Germination), वर्किंग फिल्म प्रोजेक्टर (Working Flim Projector), सोलार सिस्टम (solar system), किचन सायन्स (Kitchen Science), मेनेजटीसम (Magnetism), मल्टीपल रिफ्लेक्शन (Multiple Reflection) असे विषय विद्यार्थ्यांच्या मदतीने या संडे सायन्स स्कूल मध्ये हाताळले जातात.

 

 
 

दरम्यान, ३ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना थिएरीमध्ये काही रस नसल्याकारणाने त्यांनी स्वतः एकदा प्रयोग केल्यानंतर तो कसा झाला, हे ऐकण्यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते, असे मत या संस्थेच्या कोळे यांनी व्यक्त केले. यातील ६ वी ते ९ वी चे विद्यार्थी लेव्हल-१ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. त्यांना हवामान, खगोलशास्त्र, वीज, ऊर्जा या विषयावरील प्रयोगासाठी मार्गदर्शन केले जाते. लेव्हल-२ मध्ये विद्युतीय चुंबकत्व, यंत्र, कंपाऊंड मायक्रोस्कोप, रोबोटिक्स या विषयांचे धडे दिले जातात. अशा प्रकारचे प्रयोग हाताळल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिकदृष्ट्या बघण्याची सवय लागते. तसेच त्यांच्या तयार झालेल्या प्रश्नांचे उत्तरही आपसूकच त्यांना मिळू लागते. त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघणे, हेही तितकेच आनंददायी असते, असेही स्मिता म्हणाल्या. बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या गुंतवून ठेवण्यासाठी मुलांना विज्ञानविषयक उपक्रम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वैज्ञानिक तयार करणे हे लक्ष्य नाही, परंतु सभ्य भारतीय तयार करणे, जे त्यांच्या मेंदूचा वापर करतील, समस्यांचे समाधान शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतील. ही प्रयोगशाळा मुलांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे पण शाळेकडून यास उत्तम प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. लोकापर्यंत संडे सायन्स स्कूल पोहोचावे, असे मनापासून वाटते. प्रत्येक पालक आपल्या मुलाला काहीतरी नवीन शिकायला मिळावे म्हणून धडपडतो. त्यांच्यापर्यंत हा विषय जावा, पालकांनी व मुलांनी याला प्रतिसाद द्यावा, अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली. या संस्थेच्या कामासाठी लागणारे अर्थार्जन हे बहुतांश वेळा संस्थेच्या सदस्यांच्या माध्यमातून केले जाते. सद्यस्थितीला या गोष्टीकडे पाहण्याचा लोकांचा कल बदलला असल्यामुळे या संडे स्कूलच्या तीन दिवशी बॅचेस घेण्यात येतात. शनिवार व रविवार सुटीच्या दिवसात व बुधवारी ही एक बॅच घेण्यात येते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/