‘घाडगे अँड सून’ मालिकेत येणार आऊ
महा एमटीबी   15-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ या लोकप्रिय मालिकेत लवकरच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ऊर्फ आऊ यांची एन्ट्री होणार आहे. मालिकेत घाडगे कुटंबाच्या घराची विभागणी झाली आहे. अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये परतल्यानंतर अमृता घर सोडून जाणार असल्याचे मालिकेत दाखविण्यात येणार आहे.
 

अण्णा आणि माई अमृताला संपत्तीमधील काही भाग देणार असल्याचे कळल्यावर वसुधा या मुद्द्यावरुन भांडण करते. या घटना मालिकेत घडत असतानाच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींचे मालिकेत आगमन होणार आहे. आऊ घाडगे अँड सून’ या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘घाडगे अँड सून’ या मालिकेच्या निमित्ताने उषा नाडकर्णी बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर परतणार आहेत. काही महिन्यांपूर्वी बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये त्या स्पर्धक म्हणून दिसल्या होत्या. आता ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत आऊंची नेमकी भूमिका काय असणार? त्यांच्या येण्याने अक्षय आणि अमृता एकत्र येणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मालिका पाहूनच मिळतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/