कुंभमेळ्यासाठी १.२२ लाख स्वच्छतागृहे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
प्रयागराज : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली. मंगळवारी पहिले शाही स्नान पार पडले. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी अनेक साधू प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. स्वच्छतेसाठी भाजप सरकारने प्रयागराजमधील कुंभमेळ्यात १ लाख २२ हजार स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. ‘स्वच्छ भारत’ या उपक्रमासाठी कुंभमेळ्याचे आयोजन महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छ कुंभ, सुरक्षित कुंभ’ अशी घोषवाक्ये कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आली आहेत. १४ जानेवारीपासून सुरु झालेल्या या कुंभमेळ्याची समाप्ती ४ मार्च रोजी होणार आहे.
 

कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. या सर्वांच्या सोयीसाठी प्रशासनाने चांगले पाऊल उचलले आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात सरकारकडून हायटेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुविधेचा आणि सुरक्षेचा विचार करून त्रिवेणी संगमावर रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात एकूण १०० बेड आहेत. कुंभमेळ्यात ४० हजार एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत. यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये लेझर शो आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी ५० ‘आरओ’ वॉटर एटीएम उभारण्यात आले आहेत. यंदाच्या कुंभमेळ्यात सरकारकडून स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@