‘जेट’ सावरण्यासाठी ‘एतिहाद’ सरसावणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |


मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजला सावरण्यासाठी सहकारी कंपनी ऐतिहाद एअरवेज पुढे आली असून एकूण ४९ टक्क्यांपर्यंत हिस्सा विकत घेण्याचे धोरण आखल्याची चर्चा आहे. जेट एअरवेजमध्ये सध्या ऐतिहाद एअरवेजचा २४ टक्के वाटा आहे. जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांचा हिस्सा सतत घटत आहे. त्यांचा मुलगा निवान गोयल कार्यकारी संचालक पदावर रूजू झाले होते.

 

एतिहाद एअरवेजने ४९ टक्क्यांपर्यंत हिस्सा विकत घेण्याची तयारी केली आहे. त्यानंतर गोयल कुटूंबियांची ५१ टक्क्यांची भागदारी कमी होऊन केवळ २० टक्क्यांवर येणार आहे. यामुळे कंपनीतील निर्णयांवर मतदान करणाऱ्यास १० टक्क्यांचा हिस्सा राहणार आहे. जेट एअरवेजमध्ये एतिहाद एअरवेजने हिस्सेदारी वाढवण्याच्या वृत्ताचे परिणाम सोमवारी शेअर बाजारातही उमटले. जेट एअरवेजचा शेअर सोमवारी १५ टक्क्यांनी वाढून ३९.४५ अंशांनी वाढून २९३.४० रुपयांवर पोहोचला. सकाळी तो १९ टक्क्यांनी उसळला होता. दरम्यान जेट एअरवेजने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वित्तीय संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनीने गुंतवणूकदारांशी केलेल्या चर्चेत तूर्त कोणताही तोडगा निघालेला नाही. गेल्या ११ वर्षात कंपनीला सलग ९ वर्षे तोटा सहन करावा लागला आहे.

 

कंपनीने दिलेल्या प्रतिक्रियेत असा कोणताही व्यवहार अधिकृतरित्या ठरला नसल्याचे म्हणत संबंधित चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. एतिहाद एअरवेज ही विदेशी विमान कंपनी आहे, नियमानुसार या कंपनीला ४९ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा खरेदी करता येणे शक्य नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@