ओला –उबर चालकही जाणार संपावर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
  
मुंबई : सध्या मुंबईत चालू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पाठोपाठ ओला-उबर चालकांनीही संपाचा इशारा दिला आहे. बेस्ट संपामुळे अनेक मुंबईकर हे ओला-उबरचा पर्याय स्वीकरत होते. याच पार्श्वभूमीवर ओला-उबर कंपनी व्यवस्थापनाने ओला-उबर चालक-मालकांचे आय.डी. बंद केल्याच्या निषेधार्थ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या ओला-उबर युनिट प्रमुख प्रशांत सावर्डेकर आणि दिनेश निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी घाटकोपर येथील कुर्ला कार्यालयात ५० ते ६० जणांनी रात्रभर उपोषण केले.
 

या उपोषणकर्त्यांचे म्हणणे ओला-उबर कंपनीच्या व्यवस्थापनाने ऐकून घेतले नाही. असे या उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच व्यवस्थापनाने त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या. या दडपशाहीविरोधात राष्ट्रीय कामगार संघाने पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. ओला-ऊबर कंपन्यांचा मनमानी कारभार वाढत आहे.

 

सध्या मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे ओला-उबरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. असे असताना ओला-उबर कंपनी व्यवस्थापनाने स्वत:च्या मालकीच्या टॅक्सीला रोजगार देण्यासाठी इतर चालक-मालकांचे आय.डी बंद केले. याच्या निषेधार्थ प्रशांत सावर्डेकर आणि दिनेश निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली जे उपोषण करण्यात आले. त्याबाबत शनिवारी सकाळी घाटकोपर चिराग नगर पोलीसांनी प्रशांत आणि दिनेश यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी तातडीने लक्ष घातले नाही, तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही. परिणामी हे प्रकरण चिघळेल. अशी शक्यता वाहतूक विभाग प्रमुख सेक्रेटरी सुनील बोरकर यांनी वर्तविली.

 

ओला-उबरचे किमान भाडे हे १०० ते १५० रुपये करावे. तसेच प्रतिकिलोमीटरला १८ ते २३ रुपये दर करावेत. ओला-उबर कंपनीने नवीन वाहने घेणे बंद करावे. सध्या ओला-उबरजवळ असलेल्या वाहनांना समान काम वाटून द्यावे. या ओला-उबर चालक-मालकांच्या मागण्या आहेत. ओला-उबर चालक-मालकांनी त्यांच्या या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात १२ दिवसांचा संप पुकारला होता. या संपानंतर ओला-उबर चालक-मालकांना केवळ कंपनी व्यवस्थापनाने फक्त १ ते ३ रुपये इतरकाच इन्सेंटिव्ह दिला. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@