भारत पराभूत ; रोहितची एकाकी झुंज
महा एमटीबी   12-Jan-2019


 


सिडनी : कसोटी मालिका जिंकून भारताने इतिहास रचला, त्यामुळे एकदिवसीय मालिका चालू झाल्यावर विराटसेनेकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. सिडनी येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी हरवले. भारताचा हिटमॅन रोहित शर्माने शतक केले परंतु धोनी वगळता भारताचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने भारताला २८९ धावांचे लक्ष दिले होते. पण, या लक्षचा पाठलाग करताना भारताची ५० षटकात ९ बाद २५४ अशी स्थिती केली आणि ऑस्ट्रेलियाने भारताचा ३४ धावांनी पराभव करून १-० अशी आघाडी मिळवली.

 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतासमोर पाच गडी बाद २८८ धावांचे आव्हान ठेवले. पीटर हँड्सकोम्बच्या ७३ धावा, उस्मान ख्वाजाच्या ५९ धावा, शॉन मार्शच्या ५४ धावा आणि मार्कस स्टॉइनिसच्या ४७ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८८ धावा उभ्या केल्या. २८९ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने १३३ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याला एम.एस. धोनीने अर्धशतकी खेळी करून साथ दिली. मात्र इतर फलंदाज टिकू शकले नाही. विराट कोहली अवघ्या ३ धावांवर बाद झाला. शिखर धवन, अंबाती रायुडू खातेही उघडू शकले नाहीत, तर जाडेजा, कुलदीप यादप आणि मोहम्मद शमी यांनीही निराशाजनक कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकांमध्ये रोहित शर्माला साथ दिली, पण तोपर्यंत डाव भारताच्या हातातून निसटला होता. परिणामी भारताचे आव्हान ९ गडी बाद २५४ धावांवर आटोपले.

 

रो'हिटमॅन' शर्माची एकाकी झुंज

 

भारतासाठी सलामी फलंदाजी करताना रोहित शर्माचे १३३ धावांची खेळी केली. हे रोहितच्या कारकिर्दीतले २२वे शतक आहे. त्याने १११ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्यामध्ये ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. धवन, कोहली आणि रायडू झटपट बाद झाल्यावर रोहितने एक बाजू सांभाळून फलंदाजी केली. महेंद्र सिंग धोनीबरोबर त्याने चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. परंतु अर्धशतक केल्यानंतर धोनीचीही विकेट मिळवला ऑस्ट्रेलियाला यश मिळाले. ४६व्या शतकामध्ये रोहित शर्माला स्टॉइनिसने मॅक्सवेलकरवी बाद केले आणि भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.

 
 संबंधित बातमीबद्दल अधिक माहितीसाठी वाचा :
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/