पहिल्याच दिवशी 'उरी'ची दमदार कमाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |



मुंबई : 'सिम्बा' प्रदर्शित झाल्यानंतर २ आठवड्यांनी हिंदीमध्ये ११ जानेवारीला २ तगडे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असलेला बहुचर्चित 'उरी- सर्जिकल स्ट्राईक' आणि वादग्रस्त अशा 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारित अनुपम खेर यांचा 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हे दोन चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. यापैकी विकी कौशलच्या 'उरी'ने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीसुद्धा मने जिंकत आहे. तर, 'अॅक्सिडेंटल...' या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

 

पहिल्या दिवशी 'उरी'ने ८.२० करोड रुपयांची कमाई केली, तर 'अॅक्सिडेंटल...'ने पहिल्या दिवशी ५ करोडची कमाई केली आहे. प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही 'उरी'तील विकी कौशलच्या अभिनयाला दाद दिली आहे. सध्या 'उरी'चे शो 'हाऊसफुल्ल' चालले आहेत. 'उरी' चित्रपटात सर्जिकल स्ट्राईकचा थरार पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धार यांनी केले आहे. या चित्रपटात यामी गौतम, मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रुवाला यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. २०१६ साली उरीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने 'सर्जिकल स्ट्राईक' केले होते. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

मराठीमध्ये 'भाई' आणि भाऊ ठरतायत 'नशीबवान'

 

मराठीमध्ये या शुक्रवारी बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. पण, भाऊ कदमची महत्वाची भूमिका असलेला 'नशीबवान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तसेच, मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'भाई- व्यक्ती कि वल्ली' या चित्रपटाकडेही प्रेक्षक चांगली गर्दी करताना दिसत आहेत. याशिवाय, सचिन पिळगावकर यांचा 'लव यु जिंदगी' मात्र प्रेक्षनकांची मने जिंकण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. शनिवार, रविवार आणि संक्रांतीची सुट्टी यामध्ये कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@