माथेफिरूने दुचाक्या जाळल्या
महा एमटीबी   11-Jan-2019

 

जळगाव :

शहरात सध्या मोथेफिरुनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच विनाकारण शहरातील वेगवेगळ्या भागातील घरासमोरील लावण्यात आलेेले वाहने जाळण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच गुरुवारीच्या मध्यरात्रीनंतर माथेफिरुने हनुमान नगर, रामेश्वर कॉलनीतील दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन, रामेश्वर कॉलनीत जीमखानाजवळ संजय रंगराव रंगारी हे वास्तव्यास आहेत. त्यांची दुकाची (एमएच 19 एआर 6902) आणि भाडेकरी पुजा कोळी यांची दुकाची (एमएच 19, 6894) ह्या दोघी हिरो कंपनीच्या अ‍ॅक्ट्रीव्हा घरासमोर लावण्यात आलेला होत्या. 

 
रात्री 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास ड्युटीहून येणार्‍या काही जणांना वाहनांना आग लागलेेली दिसताच भाडेकरुंना आवाज दिला. दरम्यान, रंगारी घराबाहेर येऊन आग विझवली. पुजा कोळी यांची दुचाकी पूर्ण जळालेली असून रंगारी यांची दुचाकीचाही काही भाग जळालेला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.