हार्दिक पंड्या, लोकेश राहुल निलंबित
महा एमटीबी   11-Jan-2019नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना 'कॉफी विथ करण' या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे त्यांच्यावर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील कारवाई होत नाही, तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला दोघांनाही मुकावे लागणार आहे. अशी माहिती बीसीसीआयचे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिली.

 

हार्दिक पांड्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीसला पांड्याने दिलेली कारणे समाधानकारक नसल्याचे विनोद राय यांनी म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही खेळांडूवर कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. "मी हार्दिकच्या स्पष्टीकरणाने सहमत नाही आणि मी दोन्ही खेळाडूंवर दोन सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे. डायना इडुल्जी यांनी प्रकारणावर हिरवा कंदील दाखल्यानंतरच यावर अंतिम निर्णय होऊ शकेल." असे विनोद राय यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/