आलोक वर्मा यांचा राजीनामा
महा एमटीबी   11-Jan-2019
 
 

नवी दिल्ली : सीबीआय संचालक पदावरून समितीने हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांनी राजीनामा दिला आहे. आलोक वर्मा यांना निवड समितीने दोन विरूद्ध एक अशा मतांनी गुरुवारीच सीबीआयच्या संचालकपदावरून हटवले होते.

 

त्यानंतर त्यांची वर्णी डी.जी. फायर सर्व्हिसेस अँड होम गार्ड या पदावर करण्यात आली आहे. मात्र, आलोक वर्मांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जस्टिस ए. के. सिकरी आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या त्रिसदस्यीय समितीत दोन विरूद्ध एक अशा मताने त्यांना हटवण्यात आले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिकरी या दोघांनी त्यांना हटवण्याच्या बाजूने मतदान केले. समितीत खर्गे यांनी संचालकपदी आलोक वर्मा राहावेत या बाजूने मतदान केले. तर ज्यामुळे २-अशा मताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/