सीबीआय प्रमुखांना पुन्हा हटवण्याचा निर्णय
महा एमटीबी   10-Jan-2019
 

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने गुरुवारी पुन्हा एकदा अलोक वर्मांना सीबीआयच्या प्रमुखपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. बुधवारीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अलोक वर्मांना सक्तीच्या रजेनंतर सीबीआय प्रमुखपदी नेमण्यात आले होते.

 

आता त्यांची पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आल्याने सीबीआयच्या अंतर्गत राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय न्यायाधीश ए. के. सिक्रा व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा या समितीत समावेश होता.

 

अलोक वर्मांना हटवण्याचा निर्णय २-१ या मताधिक्याने घेण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी वर्मांना हटवण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिलाशानंतर पुन्हा २४ तासांतच सक्तीच्या रजेवर जावे लागत आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Tags: