रजनीकांतच्या चाहत्याने थिएटर बाहेर केले लग्न
महा एमटीबी   10-Jan-2019

 

 
 
 
 
 
चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘पेट्टा’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. रजनीकांत यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. चाहते रजनीकांत यांच्यावरील प्रेमाखातर त्यांच्या सिनेमाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करतात. रजनीकांत यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूकही काढतात. चाहत्यांनी केलेले हे सगळे प्रकार तुम्ही आजवर ऐकले असतील. पण रजनीकांत यांच्या एका चाहत्याने रजनीकांत यांच्यावरील प्रेमापोटी चक्क सिनेमागृहाबाहेरच लग्न केले.
 

चेन्नईमधील वुडलँड या सिनेमागृहात ‘पेट्टा’ सिनेमाचा शो सुरु होता. हा शो सुरु असतानाच या चाहत्याने सिनेमागृहाबाहेर लग्न केले. यासाठी या सिनेमागृहाबाहेर स्टेज बांधण्यात आला होता. या स्टेजवरच सर्व लग्नविधी पार पाडण्यात आले. वुडलँड या सिनेमागृहात ‘पेट्टा’ सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी या चाहत्याने अल्पोपहाराची व्यवस्थाही केली होती. दक्षिण भारतामध्ये पहाटे चार वाजता ‘पेट्टा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच्या रात्रासूनच ‘पेट्टा’ हा सिनेमा पाहण्यासाठी दक्षिण भारतातील अनेक सिनेमागृहांबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. चाहत्यांनी फटाके फोडून, आनंदाने नाचत एखाद्या सणाप्रमाणे ‘पेटटा’ या सिनेमाचे स्वागत केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/