‘चीट इंडिया’ सिनेमाच्या नावात बदल!
महा एमटीबी   10-Jan-2019


 
 
 
 
 
मुंबई : अभिनेता इमरान हाश्मी याचा 'चीट इंडिया' हा सिनेमा पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. परंतु सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाप्रदर्शन होण्यापूर्वी एक आठवडा आधीच या सिनेमाचे नाव बदलले. ‘चीट इंडिया’ या सिनेमाचे नाव बदलून ‘व्हाय चीट इंडिया’ असे नाव ठेवण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतला होता. सिनेमाचे शीर्षक हे दिशाभूल करणारे आहे, असे सेन्सॉर बोर्डाने म्हटले होते.
 
 
 
 

इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कसा गैरप्रकार चालतो. विद्यार्थ्यांऐवजी परिक्षेला कसे डमी विद्यार्थी बसविले जातात. हा सगळा प्रकार चीट इंडिया या आगामी सिनेमातून मांडण्यात आला आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या भ्रष्टाचारावर प्रकाशझोत टाकणारा हा सिनेमा आहे. अभिनेता इमरान हाश्मी याची या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका आहे. सिनेमाचे नाव बदललेले नवे पोस्टर इमरान हाश्मीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून शेअर केले. ‘का ते विचारू नका’ अशी ओळ इमरानने हा पोस्टर शेअर करताना लिहिली होती. ‘व्हाय चीट इंडिया’ हा सिनेमा येत्या १८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/