हॅप्पी बर्थडे विद्या बालन!
महा एमटीबी   01-Jan-2019

 


 
 
 
आज १ जानेवारी बॉलिवुडमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री विद्या बालन हिचा आज ३९ वा वाढदिवस! आपल्या दर्जेदार अभिनय कौशल्याने विद्याने बॉलिवुडमध्ये आज आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विद्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्याविषयी काही रंजक गोष्टी...
 

अभिनेत्री विद्या बालनने आज बॉलिवुडमध्ये नाव कमावले असले तरी कोणी एकेकाळी तिला याच बॉलिवुडने अभिनेत्री म्हणून नाकारले होते. एक-दोन वेळा नव्हे तर तबब्ल ४० वेळा विद्याला नकार ऐकावा लागला होता.

 

 
 

परंतु नकाराची ही चाळीशी विद्याने मोठ्या संर्घषाने पार केली. आज बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेत्रींमध्ये विद्याचे नाव घेतले जाते. २००५ मध्ये आलेल्या ‘परिणीता’ या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. 

 

 
 

सिनेमामध्ये पदार्पण करण्यापूर्वी विद्याने छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘हम पांच मध्ये’ राधिकाची भूमिका साकारली होती. 
 

२००७ साली ब्लॉकबस्टर ठरलेला ‘भूलभूलैय्या’ या सिनेमात विद्याने साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.


 
 

विद्याने बॉलिवुडमध्ये येण्यापूर्वी अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. 


 
 

त्यानंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘हे बेबी’, ‘किस्मत कनेक्शन’ ‘पा’, ‘डर्टी पिक्चर’, ‘कहाणी’, ‘कहाणी-२’, ‘इश्किया’, ‘बेगम जान’ ,‘नो वन किल्ड जेसिका’, ‘हमारी अधुरी कहानी’ हे एकापाठोपाठ एक सिनेमे तिने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत केले. २०१७ साली विद्याने ‘तुम्हारी सुलु’ हा सिनेमा केला होता. ‘अलबेला’ या भगवान दादांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमामध्येही तिने अभिनय केला होता. 

 

 
 

२०१२ साली निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत विद्या विवाहबंधनात अडकली. आजवर विद्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ४० वेळा नकार पत्करून देखील विद्याने आपली जिद्द सोडली नाही. येणाऱ्या त्या संधीचे ती सोने करत गेली.  
 

 बॉलिवुडमध्ये येण्यासाठी विद्याने केलेल्या संघर्षाची कहाणी अनेक नवोदित अभिनेत्रींसाठी प्रेरणादायी आहे. अभिनेत्री विद्या बालनला दै.मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाMTB’कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/