अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा पायउतार
महा एमटीबी   01-Jan-2019


मुबंई : खासगी क्षेत्रात देशातील तिसऱ्या क्रमांक असलेल्या अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ शिखा शर्मा या मंगळवारी पदावरुन निवृत्त झाल्या. त्यांच्या जागी अमिताभ चौधरी यांची नियुक्ती झाली आहे.

 

शिखा शर्मा यांनी अॅक्सिस बँकेत २००९ ला पदभार स्वीकारला होता. त्यांनी बँकेचे गुंतवणूक आणि विविध पोर्टफोलिओ वाढविण्यावर भर दिला आहे. अॅक्सिस बँकेने शिखा शर्मा यांच्या निवृत्तीची माहिती सेबी व मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. अमिताभ चौधरी यांनी मंगळवारपासून सीईओ व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे.

 

चौधरी यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी राहणार आहे. यापूर्वी ते एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाईफ इन्शुरन्समध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/