इशांत शर्मा मोडणार 'यांचा' विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |


 

लंडन : इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लड संघाने लोटांगण घातले आहे. या दोन्ही संघानी पाचव्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अनेक विक्रम नोंदवले आहेत. यामध्ये भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माने कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली. इशांतने कपिल देव यांच्या इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

 
 
 

या अंतिम कसोटी सामन्यासाठी हनुमा विहारी या नवोदित खेळाडूला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. विहारी हा आंध्रप्रदेशचा खेळाडू असून एम. एस. के. प्रसाद यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. प्रसाद हे भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख आहेत. दरम्यान, सलग पाचही सामन्यात कर्णधार विराट कोहली टॉस हरला आहे. सलग ५ वेळा टॉस हरणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट कोहली आता तिसऱ्या स्थानावर आला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@