बिग बींची लोक बिरादरी प्रकल्पाला मोठी मदत
महा एमटीबी   08-Sep-2018
 

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पासाठी २५ लाखांची देणगी दिली आहे. बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमानंतर त्यांना ही मदत केल्याचे प्रकाश आमटे यांनी सांगितले. पण याचा उल्लेख कार्यक्रमामध्ये करणं टाळल्याचे आमटे यांनी सांगितले. समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे हे नुकतेच सोनी वाहिनीवरील कौन बनेगा करोडपतीया शोमध्ये सहभागी झाले होते.

 
"> 

गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना ते आरोग्य सेवा देतात. आमटे यांच्या समाजसेवेवर प्रभावित होऊन बच्चन यांनी ही मदत केल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमात त्यांनी २५ लाख रुपये देखील जिंकले आहेत. या कार्यक्रमाबाबत आणि अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाबाबत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. या कार्यक्रमामुळे लोक बिरादरी प्रकल्पाचे काम महाराष्ट्राबाहेर जाऊन पोहचले आहे. त्यामुळे लोक बिरादरी प्रकल्पाला संपूर्ण भारतातून जनता भेट द्यायला येईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांना मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/