चिरतरुण आशा ताई झाल्या ८५ वर्षांच्या...
महा एमटीबी   08-Sep-2018 

आशा भोसले हे संगीत क्षेत्रातील एक अदबीने घेतले जाणारे नाव. आज आशाताईंचा ८५ वा वाढदिवस! आशाताईंनी आपल्या आवाजाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. त्यांच्या सुरांनी संगीतरसिकांवर अक्षरश: जादू केली. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अशा काही गोष्टी ज्या क्वचितच तुम्हाला माहित असतील.....  
 
 

आशाताईंविषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहेत का?

 
>  आशा भोसले यांनी आपल्या वयाच्या दहाव्या वर्षांपासून गाणं गायला सुरुवात केली.
 
 
>  त्यांनी आपलं पहिलं गाणं लता मंगेशकरांसोबत घरखर्चासाठी गायलं होतं.
वयाच्या १६व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झालं.
 
 
>  गणपतरावांशी न पटल्याने आपल्या २ मुलांसह त्यांनी माहेरी परतणं पसंत केलं.
 
 
>  त्यानंतरही त्यांनी आपला गायनाचा प्रवास चालूच ठेवला.
 
 
>  मोहम्मद रफींसोबत त्यांचं 'नन्हें मुन्हे बच्चे' हे गाणं खूप गाजलं.
 
 
>  हिंदी चित्रपटसृष्टीच्या जवळ-जवळ सर्वच संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं आहे.
 
 
>  १९६० ते १९७०च्या दशकात आशाताईंनी गायलेल्या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
 
 
>  १९८० मध्ये आर. डी. बर्मन यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं.
 
 
>  मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपूरी, तमीळ, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी १६ हजारांहून अधिक गाणी गायली.
 
 
>  २०११ मध्ये त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलं.
 
 
>  २००८ साली त्यांना भारत सरकारचा मनाचा पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
>  २०१२ मध्ये वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी 'माई' या चित्रपटात काम केलं.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/