भारताचा युवा नेमबाज ह्रदयचा सुवर्णवेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |




दक्षिण कोरिया : येथे सुरु असलेल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा युवा नेमबाज ह्रदय हजारिकाने आज सुवर्णपदक पटकावले. त्याने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत हे सुवर्णपदक पटकावले. तर दुसरीकडे १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या महिला संघानेदेखील आज सुवर्णपदकाचा वेध घेतला.

 
 
 

१० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत ह्रदय हजारिकाची इराणच्या मोहम्मद नेकूनाम याच्याशी लढत होती. यावेळी दोघांनाही सामान गुण मिळाल्याने दोघांमध्ये शूट ऑफखेळवण्यात आला. यात हजारिकाला १०.३ तर नेकूनामला १०.२ गुण मिळाले. ०.१ गुणांनी शूटऑफ जिंकत भारताच्या हजारिकाने १० मीटर एअर रायफल स्पर्धेतील सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दरम्यान, वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदकांची कमाई केली असून कोरिया नंतर तो दुसऱ्या स्थानावर आहे. यात ६ सुवर्ण, ७ रौप्य तर ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@