सुबोध भावे... सातवे आसमान पर...
महा एमटीबी   07-Sep-2018
 


मुंबई: मराठीतील एक प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून सुबोध भावेची ओळख आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्या भूमिकेतून काही तरी वेगळं देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सध्या त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

 

सुबोध भावेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सविता दामोदर परांजपे' आणि 'पुष्पक विमान' या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. 'सविता दामोदर परांजपे'ने आतापर्यंत महाराष्ट्र भारत चांगली कामे केली आहे. सध्या झी मराठीवर चाललेल्या 'तुला पाहते रे' या मालिकेलाही लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्याच्या व्यक्तिरेखेला खास पसंती मिळतेय. त्याने याचा आनंद सोशल मीडिया साईटवर व्यक्त केला.

 

आता उत्सुकता आहे ती त्याच्या पुढच्या काही सिनेमांकडे. त्याचा 'आणि काशिनाथ घाणेकर' हा ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल तर अभिनेत्री श्रुती मराठे सोबतचा 'शुभ लग्न सावधान' हा १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/