अभय, दीप्ती आहेत संजयचे 'लकी' स्टार...
महा एमटीबी   07-Sep-2018

 


  
 
 
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचं गाजलेलं नाव म्हणजे संजय जाधव. आतापर्यंत त्याने केलेले सर्व चित्रपट हिटच्या यादीत जाऊन बसले आहेत. विशेष म्हणजे यामुळे अनेक कलाकारांची गाडी रुळावर आली. मात्र पहिल्यांदाच संजय जाधवने त्याच्यासाठी ‘लकी’ असलेल्या कलाकारांची नाव जाहीर केली आहेत.
 

संजय जाधवने आपल्या आगामी ‘लकी’ चित्रपटाची घोषणा केल्यावर त्यामधले कलाकार कोण असतील याविषयी गेले कित्येक दिवस चित्रपटसृष्टीमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. पुन्हा तेच चेहरे पाहायला मिळतील की नवीन काही बघायला मिळेल याची उत्सुकता सगळ्यांना निर्माण झाली होती. संजयने या नवोदित कलाकारांच्या नावाची घोषणा सोशल मीडियाव्दारे केली आहे.

 

नवोदित अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती ही नवी जोडी पहिल्यांदाच लकी चित्रपटातून डेब्यु करणार आहे. विशेष म्हणजे या नव्या कलाकारांची ओळख व्हावी यासाठी संजयने एक गाणं चित्रीत केल्याचं पाहायला मिळालं. याच नव्या प्रयत्नामध्ये त्यांनी अनोख्या स्वरुपात या नवोदित कलाकारांची ओळख करुन दिली आहे, असं निर्माते सुरज सिंग म्हणाले.

 
 
 

‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला 'लकी’ चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजून यामध्ये नवीन काय काय असेल याची उत्सुकता सर्वाना आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/