भारतीय संघ इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड करणार का?
महा एमटीबी   07-Sep-2018


 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली. हा सामना येथील ओव्हल मैदानात खेळवला जात आहे. या मालिकेत अगोदरच हि मालिका ३-१ अशी आघाडी घेतली आहे. तर भारतीय संघासाठी इंग्लंड दौऱ्यातील हा शेवटचा सामना असून शेवट गोड करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. मात्र आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी इंग्लंडचा संघ पूर्णपणे सज्ज असेल.
 

अंतिम कसोटी सामन्यासाठी भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. या कसोटी सामन्यासाठी पृथ्वी शॉची जोरदार चर्चा सुरु असताना हनुमा विहारीला संघात स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विहारी हा २०१२ च्या अंडर १९ विश्वविजेता संघाचा एक महत्वाचा खेळाडू होता. भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा तो २९२ खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आजच्या कसोटीसाठी रवींद्र जडेजादेखील संधी मिळाली आहे. दरम्यान, या अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/