ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली!
महा एमटीबी   05-Sep-2018 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 

दिलीप कुमार यांना त्यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे लीलावती रुग्णालयाचे संचालक डॉ. अजय पांडे यांनी सांगितले आहे. परंतु दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मात्र त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांच्या चाहत्यांना करण्यात आले आहे. चेस्ट इन्फेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/