‘काशिनाथ घाणेकर’ मध्ये सुमीत राघवन दिसणार ‘या’ भूमिकेत
महा एमटीबी   04-Sep-2018 

 

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे यांच्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा मराठी सिनेवर्तुळात होत आहे. या सिनेमात अभिनेता सुमीत राघवनही दिसणार आहेत. सिनेमातील सुमीतचा लुक सुबोध यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
 

सुमीत राघवन हा या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूंची भूमिका साकारत आहेत. सुमीत राघवन आपल्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाले की अभिनयातील अवलिया डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला ही भूमिका करायला मिळाली. यात मी माझे भाग्य समजतो. मला त्यांची नक्कल करायची नव्हती. या सिनेमाच्या चित्रीकरणापूर्वी मला डॉ. श्रीराम लागू यांचे आशिर्वाद लाभले’. अभिनेता सुबोध भावे या सिनेमात दिवंगत अभिनेते काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत दिसतील. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/