आशिया चषकाचा भारतच 'दादा'
महा एमटीबी   29-Sep-2018


 


बांगलादेशवर भारताचा गडी राखून विजय


दुबई : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. भारतीय संघाने गडी राखून बांगलादेशवर विजय मिळवत आशिया कपवर आपले नाव कोरले आहे. आता पर्यंत एकूण सात वेळेस सलग दुसऱ्यांदा भारताने ही ऐतिहासिक कामगिरी केली. पूर्ण मालिकेमध्ये एकतर्फी सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात मात्र बांगलादेशने विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजवले. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगल्याने अनेक शक्यतांना उधाण आले होते. मात्र जायबंदी झालेल्या केदार जाधवने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत भारताला विजय मिळवून दिला.

 

दुबई येथील स्टेडियममध्ये रंगलेल्या या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात करत धावफलक हलते ठेवले. तर लिटन दास याने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत आक्रमक सुरुवात केली. त्याने ११७ चेंडूंत १२ चौकार षटकारांसह १२१ धावा केल्या. मात्र दास वगळता बांगलादेशच्या इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजाच्या आक्रमक माऱ्यासमोर नांग्या टाकल्या यामुळे बांगलादेशचा डाव ४८. षटकांत २२२ धावांवर गडगडला. भारतातर्फे कुलदीप यादव याने , केदार जाधव याने तर जसप्रीत बुमरा चहलने एक विकेट मिळवली.

 

बांगलादेशने दिलेल्या माफक आव्हानानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. गब्बर शिखर धवन अंबाती रायडू हे दोघे झटपट बाद झाले. मात्र कर्णधार रोहित शर्मा (४८), दिनेश कार्तिक, (३७) आणि महेंद्रसिंग धोनी (३६) यांनी धावफलक हलता ठेवत भारताला विजयच्या जवळ नेले. त्यानंतर रवींद्र जडेजा (२३), केदार जाधव (२३) भुवनेश्वर कुमार (२१) यांनी विजय मिळवून दिला. सामन्याचा मालिकावीर म्हणून शिखर धवनला तर सामनावीर म्हणून लिटन दासला गौरवण्यात आले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/