हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचं निधन
महा एमटीबी   29-Sep-2018


 

मुंबई: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे शनिवारी निधन झाले, ते ८४ वर्षाचे होते. त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सोलो हार्मोनियम वादनाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा व्रतस्थ कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

पंडित तुळशीदास बोरकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर उपचार चालू असताना शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. डॉक्टरांची दिलेल्या माहितीनुसार त्यांचा हर्नियाचा आजार बारा झाला होता. श्वसनाचा त्रास चालू झाल्यावर त्यांना क्षयरोगाचे निदान झाले होते. परंतु वयोमानानुसार त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/