मनसैनिक कार्यकर्ते की गुंड?
महा एमटीबी   27-Sep-2018

 


 
 
 
अभिनेत्री तनुश्री दत्ताला मनसे कार्यकर्त्यांनी धमकावले?
 
 

मुंबई : नाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी तनुश्री दत्ता व तिच्या कुटंबाला नाना पाटेकरांशी पंगा घेतल्यामुळे धमकावले होते. एवढेच नव्हे तर मनसैनिकांनी तनुश्री व तिचे आई वडिल कारमध्ये बसले असताना त्यांच्यावर हल्लादेखील केला होता. असे तनुश्रीचे म्हणणे आहे.

 

त्यावेळी तनुश्रीची लहान बहिण इशिता दत्ता घरी होती. तनुश्री ताई, आई आणि बाबा तिघे त्या प्रसंगात होता. मी मात्र घरी होते. परंतु ते घरी परत येतील की नाही याची मला शाश्वती नव्हती.” अशा शब्दांत इशिताने आपला अनुभव व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/