‘या’ ५ निसर्गरम्य देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |

 


 
 
 
परदेश पर्यटनाचा जाण्याचा विचार करत असाल तर एकदा ‘या’ ५ देशांचा विचार करून मगच कुठे फिरायला जायचे ते ठरवा. कारण परदेशी प्रवास करण्यासाठी व्हिसा मिळणे आवश्यक असते. पण व्हिसा मिळविण्यासाठी करावी लागणारी खटपट ही लांबलचक व कंटाळवाणी असते आणि एवढा सगळा आटापिटा करून व्हिसा मिळेलच याची शाश्वतीही देता येत नाही. पण ‘या’ ५ निसर्गरम्य देशांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाची गरज लागणार नाही.
 

१. इंडोनेशिया

 

 

 

बाली हे इंडोनेशियामधील एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी असून हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धा येथेच पार पडल्या होत्या. भारतीय नागरिक इंडोनेशियामध्ये व्हिसाशिवाय ३० दिवस राहू शकतात.
 

भूतान

 

 
 

भूतान हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला देश! तेथील सृष्टिसौंदर्य डोळे दिपवणारे आहे. विशेष म्हणजे भूतानला जाण्यासाठी भारतीयांना कोणत्याही व्हिसाची आवश्यकता नाही.

 

मालदीव

 

 
 

मालदीव हा बेटांचा देश म्हणून ओळखला जातो. मालदीवमध्ये भारतीय तब्बल ९० दिवसांसाठी व्हिसाशिवाय राहू शकतात.

 

मॉरिशस

 
 

 

 

मॉरिशसच्या निळ्याशार समुद्रकिनारी राहण्यासाठी भारतीयांन व्हिसाची गरज नाही. भारतीय पर्यटक ९० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात.
 

नेपाळ

 
 

 

 

नेपाळ व भारतामध्ये शांतता करार असल्याने तेथे पर्यटनासाठी भारतीयांना कोणत्याही व्हिसाची गरज भासत नाही.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@