आयात शुल्कवाढीचा चीनवर परीणाम होण्याची शक्यता
महा एमटीबी   27-Sep-2018
 

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आयात वस्तूंवरील वाढील शुल्काबाबतचा निर्णय घेत चीनला झटका दिला आहे. केंद्रीय अर्थखात्याने एकूण १९ वस्तूंवर आयात शुल्क वाढवून सरकारच्या तिजोरीवर वाढणारा भार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डळमळणारा रुपया मजबूत होण्यास यामुळे मदत होईल आहे. याचा परीणाम प्रामुख्याने चीनच्या बाजारपेठेवर होणार आहे. हा चीनला भारताकडून मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

 

बुधवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, हवाई इंधन, पाचत्राणे, हिरे-रत्न, सोने चांदीचे दागिने आदी वस्तूंचा सामावेश आहे. चीनमधून आयात होणाऱ्या ईलेक्ट्रोनिक वस्तूंची संख्या जास्त आहे. चीनकडून ६१ अब्ज डॉलर्स इतक्या किमतीची आयात केली जाते. त्याचा फटका आता चीनी बाजारपेठांना बसणार आहे. अमेरीकेशी सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे आधीच संकटात सापडलेल्या चीनच्या समस्या आणखी वाढणार आहेत. अमेरीकेने सुमारे दोनशे अब्ज डॉलरच्या आयात केलेल्या वस्तूंवर कर लावण्याची घोषणा केली होती. येत्या काळात याबाबतचे परीणाम जाणवू लागतील, असे जाणकारांचे मत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/