सायना- कश्यप करणार लग्न!
महा एमटीबी   26-Sep-2018

 


 
 
 
हैदराबाद : भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. येत्या १६ डिसेंबरला हा लग्नसोहळा संपन्न होणार असून त्यानंतर ५ दिवसांनी रिसेप्शन असेल. या दोन्ही बॅडमिंटनपटूंच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. लग्नाला मात्र दोघांचे कुटुंबिय आणि जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित असतील. लग्नानंतर होणाऱ्या रिसेप्शन सोहळ्याला मात्र क्रीडा क्षेत्रातील आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांना आमंत्रम असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सायना आणि कश्यपच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. सायनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोघांचा फोटो शेअर केल्याने या चर्चेला उधाण आले होते.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/