नाना पाटेकरांनी गैरवर्तन केल्याचा तनुश्री दत्ताचा आरोप!
महा एमटीबी   26-Sep-2018

 


 
 
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या चित्रिकरणाच्यावेळी ही घटना घडल्याचा दावा अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे.
 

हॉर्न ओके प्लीज या सिनेमातील एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकरांनी माझ्याशी गैरवर्तन केले. चित्रिकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच नाना पाटेकरांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मी या प्रकाराबाबत सिनेमाचे दिग्दर्शक व निर्मात्यांकडे तक्रार केली. तर त्यांनी उलटपक्षी मला नाना सांगतील तसेच करण्यास सांगितले. असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने हे म्हटले. तसेच नाना पाटेकरांनी गुंडाकडून मला व माझ्या कुटुंबियांना धमकावले होते. असा धक्कादायक आरोपही तनुश्रीने केला. २००५ साली तनुश्रीने ‘आशिक बनाया आपने’ या सिनेमातून बॉलिवूडमधून पदार्पण केले होते. गेली ८ वर्षे तिने सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर ठेवले होते. आता मात्र इतक्या वर्षांनी तिने अभिनेते नाना पाटेकरांवर हा आरोप पुन्हा केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/