नागराज मंजुळेंसाठी अमिताभ राहणार नागपुरात !
महा एमटीबी   26-Sep-2018

 


 
  
 
मुंबई : सैराटच्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आपला पुढील सिनेमा घेऊन येत आहे. 'झुंड' हा त्याचा आगामी सिनेमा असून या सिनेमाच्या दिग्दर्शनाद्वारे ते बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहेत. नागपूरमध्ये या सिनेमाचे चित्रिकरण होणार आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन हे तब्बल ४५ दिवस नागपूरमध्ये मुक्कामी राहणार आहेत. झुंड हा हिंदी सिनेमा फुटबॉलवर आधारित असून एका निवृत्त क्रीडा शिक्षकाची कहाणी या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन या सिनेमात या निवृत्त शिक्षकांची भूमिका साकारत असल्याचे कळते.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/