अभिमानास्पद! भारतीय टेबल टेनिसपटूंनी मिळविली १८ पदके
महा एमटीबी   25-Sep-2018

 


 
  
कोविलोवो : सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये भारतीय टेबल टेनिसपटूंनी तब्बल १८ पदके कमावली आहेत. भारतीय खेळाडू मुलांनी कॅडेट एकेरी, कॅडेट सांघिक आणि मुलींनी ज्युनियर सांघिक गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 

मुलींच्या ज्युनियर गटातून दिया चितळे, स्वातिका घोष व अनुशा कुटुंबले या तिघी खेळाडू खेळत होत्या. अंतिम फेरीत त्यांनी सिंगापूरच्या खेळाडूंना ३-१ ने मात देत सुवर्णपदक मिळविले. पायस जैन आणि विश्वा दिनदयालन या जोडीने सुवर्णपदक मिळविले. तर दिव्यांश श्रीवास्तव आणि आदर्श ओम छेत्री या जोड्यांनी रौप्यपदक पटकावले. मुलांच्या ज्युनियर सांघिक गटात रिगन अल्ब्युक्युरेक्यु, मनुश शाह व अनुक्रम जैन यांनी कांस्यपदक कमावले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/