‘या’ अभिनेत्याने जवानांसाठी लाटल्या पोळ्या!
महा एमटीबी   25-Sep-2018

 

 

 
 
 
मुंबई : एका बॉलिवुड अभिनेत्याने भारतीय लष्करातील जवानांसाठी पोळ्या लाटल्या आहेत. लष्कराच्या कॅन्टिनमध्ये त्याने ही कामगिरी केली असून त्याद्वारे जवानांची त्याला सेवा करायला मिळाली असे त्याचे मत आहे. हा बॉलिवुड अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुशांत सिंह राजपूत आहे. सुशांतला देशाच्या जवानांसाठी हे करताना खूप अभिमान वाटला. इन्स्टाग्रामवर सुशांतने त्याचा पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. या कामगिरीमुळे सध्या सोशल मीडियावर सुशांतचे कौतुक होत आहे.
 
 
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/