पाकिस्तानवर दणदणीत विजय; भारत अंतिम फेरीत
महा एमटीबी   24-Sep-2018

 

 

दुबई : सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. आशिया चषक स्पर्धेतील भारताचा हा सलग चौथा विजय असून पाकिस्तानवर सलग दुसरा विजय आहे. पाकिस्तानने दिलेले २३८ धावांचे आव्हान पार करताना भारताच्या सलामीच्या जोडीने केलेली द्विशतकी भागीदारी ही भारतीय डावाचे वैशिष्ट्य ठरली. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्क केले आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/