धक्कादायक! अजयने शेअर केला नंबर, काजोल अडचणीत
महा एमटीबी   24-Sep-2018

 


 
 
 
मुंबई : अभिनेता अजय देवगणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पत्नी काजोलचा नंबर ट्विट केला आहे. हा नंबर खरा असून काजोलला या नंबरवर अनोळखी व्हॉट्सअॅप मॅसेजेस आणि फोन येण्यास सुरुवात झाली आहे. अजय देवगणचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण यामुळे ट्विटरवरील ट्रोलर्सनी मात्र अजयच्या या ट्विटवर रिप्लाय करण्यास सुरुवात केली आहे. अजयच्या या ट्विटने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. ट्रोलर्सकडून त्याची खिल्ली उडवली जात आहे. अजय देवगणने हे असे का केले असावे याच्या अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
 

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/