प्राजक्ता माळीचा चाहत्यांसह अनोखा उपक्रम
महा एमटीबी   24-Sep-2018

 


 
  
पुणे : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज सकाळी पुण्यात आपल्या चाहत्यांसह मिळून एक अनोखा उपक्रम राबवला. हा उपक्रम म्हणजे गणपती विसर्जनानंतरची स्वच्छता मोहिम! प्राजक्ताने आज ही स्वच्छता योजना राबवण्यासाठी काल फेसबुकवरून आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते. आज सकाळी पुण्यात प्राजक्ताचे चाहते मोठ्या संख्येने तिच्या या उपक्रमात सहभागी झाले. सर्वांनी मिळून पुण्यातील टिळक रस्त्याची झाडलोट केली.
 
 
 
 
 
विसर्जनानंतर रस्त्यांवर पडलेला केरकचरा, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा त्यांनी मार्गी लावला. गेल्या वर्षीपासून प्राजक्ता मेक माय पुणे हा उपक्रम राबवत आहे. प्राजक्ताच्या या स्वच्छता मोहिमेला तिच्या चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यासाठी तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच माझ्या सोशल मीडियावरील पोस्टला, फोटोजना नुसते लाईक आणि शेअर करणारे माझे चाहते नव्हे तर माझ्या या आवाहनाला प्रतिसाद देत रस्त्यावर स्वच्छतेसाठी उतरणारे हे माझे खरे चाहते आहेत. अशा शब्दांत प्राजक्ताने तिच्या चाहत्यांचे कौतुक केले.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/