भारत-बांगलादेश सामना; बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत
महा एमटीबी   21-Sep-2018
दुबई : आशिया चषकाच्या सुपर फोरचे सामने आजपासून सुरु झाले आहेत. यामध्ये भारत आणि बांगलादेश आमनेसामने असून भारताने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन्ही सामान्याप्रमाणेच भारतीय गोलंदाज चमकदार गोलंदाजी करत असून बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. यामध्ये रवींद्र जडेजाने तीन गडी बाद केले तर भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमरा या दोघांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दरम्यान, हाँगकाँग आणि पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघ अव्वलस्थानी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/