का घाबरतो सुबोध भावे बायकोला?
महा एमटीबी   20-Sep-2018

  
 
मुंबई : ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री श्रुती मराठेची जोडी यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच निर्मीती सावंत, आनंद इंगळे, गिरिश ओक, किशोरी आंबिये अशी सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे.
 

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यात ‘मी बायकोला घाबरतो!’ असा आवाज बॅकग्राऊंड म्युझिकला ऐकू येतो. त्यावरून एकूणच बायकोला जगातील सर्वच नवरे घाबरतात. असा समज हेरून त्यावर भाष्य करणाऱ्या या टीझरने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला होता. त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

 
 
 

लग्न म्हणजे जबाबदारी असते असे मानत, लग्नानंतर आपले काय होईल? याचा विचार करून लग्नापासून पळ काढणारा सुबोध, तर त्याला समजावणारी त्याच्यावर भरपुर प्रेम करणारी श्रुती ही त्याला लग्नासाठी तयार करण्यात यशस्वी होते का? एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे जोडपे लग्न करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला सिनेमा पाहिल्यावरच मिळतील. येत्या १२ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 
 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/