आणि सलमानला आली आईची आठवण...
महा एमटीबी   20-Sep-2018

 


 
 
 
मुंबई : बॉलिवुड अभिनेता सलमान खान याला आईची आठवण आली आणि त्यामुळे त्याला गहिवरून आले. प्रत्यक्ष आयुष्यात सलमानला दोन आई आहेत. परंतु त्याला आठवण झाली आहे ती त्याच्या पडद्यावरील आईची अर्थात दिवगंत अभिनेत्री रिमा लागू यांची!
 

रिमा लागू यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये सलमानच्या आईची भूमिका साकारली होती. पण आज सलमानला अचानक त्यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे रिमा लागू यांनी त्यांच्या निधनापूर्वी होम स्वीट होम या मराठी सिनेमात काम केले होते. या सिनेमाविषयी बोलताना सलमानला रिमा लागूंच्या आठवणीने गहिवरून आले. घरी माझ्या दोन आई आहेत. पण सिनेमात मला एक आई होती,रिमा लागू! ती खूप प्रेमळ होती. अशा शब्दांत सलमानने रिमा यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच रिमा यांचा ‘होम स्वीट होम’ हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केले.

 
 
 

ऋषिकेश जोशी, स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे, मोहन जोशी या कलाकारंनी या सिनेमात रिमा लागूंसोबत काम केले आहे. अभिनेता ऋषिकेश जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून दिगदर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. २८ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/