पाकचे लोटांगण; चर्चेसाठी मोदींना पत्र
महा एमटीबी   20-Sep-2018


 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. दोन्ही देशांमधील शांततेची चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी हे पत्र लिहिल्याची माहिती आहे. त्यासोबतच या पत्रामध्ये दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न व इतर समस्या चर्चेने सोडवल्या पाहिजेत अशी विनंती केल्याचे समोर आले आहे.

 

डिसेंबर २०१५ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान शांततेसाठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी, यासाठीही इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावा केल्याचे समोर आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/