पाकिस्तानचा मैदानात व सोशल मीडियावर देखील धुव्वा
महा एमटीबी   20-Sep-2018 

 

दुबई : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवत भारतीय संघाने  शानदार विजय मिळवला. या विजयनंतर देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर देखील पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवण्यात आली. यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने देखील पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवली आहे.
 
 
 
 
 

दरम्यान, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अशा सर्व आघाड्यांवर भारताने जोरदार कामगिरी करत करोडो भारतीयांना अपेक्षित असलेली कामगिरी केली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा डाव १६२ धावांवर गडगडला. १६३ धावांचे माफक लक्ष समोर ठेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने २ गडी गमावत पाकिस्तानचे नामोहरण केले. या विजयांनंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे.

 
पराभवानंतर पाकिस्तान सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्यावरील काही निवडक प्रतिक्रिया...
 
 
 

  
 
 
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/