गणेशउत्सवात रेल्वेची भक्तांना खुशखबर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |



 



मुंबई: अनंत चतुर्दशीनिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने पाच दिवस ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हार्बर आणि ट्रान्स हार्बर वर देखील ज्यादा गाड्या चालवल्या जातील. मध्य आणि हार्बर रेल्वेवर प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीचे नियोजन व्यवस्थित व्हावे यासाठी या तिन्ही मार्गावरचे रविवारचे मेगाब्लॉकसुद्धा रद्द करण्यात आले आहेत.

 

मध्य रेल्वे


>मध्यरात्री १.३० वाजता सी.एस.टी. स्थानकातून लोकल सुटणार असून पहाटे ३.०० वाजता कल्‍याण स्थानकात पोहोचेल.

 

>मध्यरात्री २.३० वाजता सी.एस.टी. स्थानकातुन लोकल सुटणार असून पहाटे ३.३० वाजता कल्‍याण स्थानकात पोहोचेल.

 

>मध्यरात्री १.३० वाजता कल्‍याण स्थानकातून लोकल सुटणार असून पहाटे ३.३० वाजता सी.एस.टी. स्थानकात पोहोचेल.

 

>मध्यरात्री २.०० वाजता ठाणे स्थानकातून लोकल सुटणार असून पहाटे ३.०० वाजता सी.एस.टी. स्थानकात पोहोचेल.

 

हार्बर रेल्वे
 

>मध्यरात्री १.३० वाजता सी.एस.टी. स्थानकातून लोकल सुटणार असून पहाटे २.५० वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल

 

>मध्यरात्री २.४५ वाजता सी.एस.टी. स्थानकातून लोकल सुटणार असून पहाटे ४.०५ वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल

 

>मध्यरात्री १.०० वाजता पनवेल स्थानकातून लोकल सुटणार असून पहाटे २.५० वाजता सी.एस.टी. स्थानकात पोहोचेल

 

>मध्यरात्री १.४० वाजता पनवेल स्थानकातून लोकल सुटणार असून पहाटे ३.०५ वाजता सी.एस.टी. स्थानकात पोहोचेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@