अनुष्का शर्माला ‘स्मिता पाटील’ पुरस्कार
महा एमटीबी   20-Sep-2018

 


 
 
 
ठाणे : प्रियदर्शनी अकॅडमी आपला ३४ वा वार्षिक जागतिक पुरस्कार वितरण सोहोळा साजरा करीत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यातील यंदाची स्मिता पाटील पुरस्काराची विजेती अभिनेत्री अनुष्का शर्मा ठरली. स्मिता पाटील यांच्या नावाने हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जातो.
 

“सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी प्रियदर्शनीची आभारी आहे. माझ्या यशात संवाद लेखक, दिग्दर्शक व सह कलाकार यांचाही मोठा वाटा आहे. जेष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे अशा शब्दांत अभिनेत्री अनुष्का शर्माने आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

 

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार अनुष्काला देण्यात आला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रियदर्शनी अकॅडमीचे कार्याध्यक्ष निरंजन हिरानंदानी, नानिक रूपांनी, डॉक्टर आर.ए. माशेलकर, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, अभिनेत्री पूनम धिल्लन आदी मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. प्रभोध ठक्कर यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आभारप्रदर्शन केले. तर रीना रूपानी यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/