२५ रोजी नशिराबाद येथे वार्षिक महामस्तकाभिषेक, रथ महोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |

१००८ भगवान नेमीनाथ रथाची ८३ वर्षांची परंपरा कायम


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 

नशिराबाद, २० सप्टेंबर
येथील दिगंबर जैन मंदरि ट्रस्टतर्फे भगवान नेमीनाथ यांच्या वार्षिक महामस्तकाभिषेक तथा रथ महोत्सवाचे आयोजन २५ रोजी श्री दिगंबर जैन मंदिर परिरसर याठिकाणी करण्यात आले आहे. १९३५ पासून भगवान नेमीनाथ यांच्या भव्य रथ महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. रथाचे निर्माण पितांबर देवराम शेठ साखरे यांनी केले असून दगडू व सोनू परशुराम पांंचांळ व सुतार या कारागिरांनी रथ निर्मितीचे काम केले आहे. रथाला मोगरी लावण्याची परंपरा वारसानुसार कायम असून झिपरू मिस्तरी, एकनाथ झिपरू मिस्तरी, प्रशांत एकनाथ मिस्तरी यावर्षी मोगरी लावणार आहेत. याठिकाणी प्रथम तिर्थकर भगवान आदिनाथ, भगवान पार्श्‍वनाथ, भगवान मुनी सुप्रतनाथ, चंद्रप्रभू, भगवान बाहुबली आदी १४ तिर्थकरांच्या प्रतिमा विराजमान आहेत.
 
असा असेल धार्मिक विधी
२५ रोजी सकाळी ८ वा. पूजा व अभिषेक, आरती, ९ वाजता कलश यात्रा व भव्य रथोत्सव प्रारंभ, १२ ते १:३० महाप्रसाद २ ते ५ ध्वजारोहण, मंडपशुध्दी, बोली, श्रीजींचा अभिषेक, संगीतमय कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुख्य मार्गर्शक प्रविण कुमार जैन, अध्यक्ष दिनेश जैन, उपाध्यक्ष मंगेश जैन, सचिव महावीर जैन, सदस्य प्रकाश जैन, विजय जैन, राजेद्र जैन, वर्धमान जैन, महेश जैन व सकल जैन समाज आणि सम्यकवर्धिनी महिला मंडळ नशिराबाद यांनी केले आहे.
 
 
१५७ वर्षांच्या प्राचीन जैन मंदिराचा जिर्णोध्दार
मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी संत शिरोमणी आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज यांच्या आर्शिर्वादाने मुनी श्री अक्षय सागर व मुनी श्री नेमीसागर महाराज यांच्या प्रेरणेने मंदिराचे लाल पाषाणात निर्माण होत आहे. यासाठी अव्दीय कलाकुसरीचा उपयोग केला जात आहे. जिर्णोध्दाराचे कार्य अधिक गतीने होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर जिर्णोध्दार सहायक समिती ज्योती चंद्रकांत सरोदय, अशोक कस्तुरे, वसंतराव मनोरकर, विजय महेद्रकर, आण्णांजी आहाळे, विपुल शहा, मेहद्र कुमार झांजरी, प्रकाश धुमाळ यांनी केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
@@AUTHORINFO_V1@@