‘अमृत’मध्ये वाढीव वस्तीचाही समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |
भाजपाचा पुढाकार, महापौर व उपमहापौरांच्या उपस्थितीत बैठक

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
जळगाव, १९ सप्टेंबर
जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठ्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत’ योजनेत शहरालगतच्या वाढीव वस्तीचाही समावेश होण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला आहे. महापौर व उपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मनपात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.
 
 
अमृत योजनेचे काम सन २०१५ मधील डीपीआरनुसार (सविस्तर प्रकल्प अहवाल) करण्यात येत आहे. सरकारने हा अहवाल मंजूर केल्यानंतर महापालिका हद्दीत चहुबाजूने नागरी वस्ती विस्तारत गेली. आताच्या कामात अशा ५१ ते ५२ कॉलनींचा समावेश नाही. त्यामुळे तेथे जलवाहिनी टाकली जात नसल्याच्या असंख्य तक्रारी रहिवाशांकडून होत आहेत. याची भाजपाने दखल घेतली असून, नूतन महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी महापौरांच्या दालनात अमृत योजनेची आढावा बैठक झाली. आ. सुरेश भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, श्रीराम खटोड व मक्तेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाढीव भागातही अमृतचे काम होण्यासाठी काय करता येईल? यावर बैठकीत चर्चा करण्यात येऊन पर्यायही सुचविण्यात आले. त्यास मक्तेदाराच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
नागरिकांना मिळणार पूर्वसूचना
जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यापूर्वी तेथील रहिवाशांना पूर्वसूचना द्यावी. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही, अशी सूचना आ. सुरेश भोळे यांनी मक्तेदार प्रतिनिधीला केली. जलवाहिनीच्या कामामुळे रस्ता बंद होतो, वाहने घरातच अडकून पडतात, आधीचे नळसंयोजन फुटत असल्याने पाण्याची समस्या उद्भवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असल्याचे आ. भोळे यांनी सांगितले. 
 
चार ते पाच कोटी रुपये वाचणार
भूमिगत गटार योजनेची निविदाप्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी एक निविदा प्राप्त झाली आहे. योजनेतील ट्रीटमेंट प्लँटसाठी गिरणा नदीजवळ असलेली शासकीय जागा बैठकीत सुचविण्यात आली. ही जागा मिळाल्यास महापालिकेचा पर्यायाने जळगावातील करदात्यांचा पैसा वाचणार आहे. त्यासाठी सरकारशी पत्रव्यवहार करण्यावरही चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

@@AUTHORINFO_V1@@